देवलापार : अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन कुप्पम,आंध्र प्रदेश येथे गणित व विज्ञान विषयाचे प्रशिक्षण दि. २८ ते ३१ जानेवारी २०२५ पर्यंत चार दिवशीय प्रशिक्षण संपन्न झाले. सदरचे प्रशिक्षण राज्य विज्ञान शिक्षण संस्था प्रादेशिक विद्या प्राधिकरण रवीनगर नागपूर तर्फे आयोजित केले होते. या प्रशिक्षणामध्ये कन्स्ट्रक्टिव्हिजम इन हँड्स ओन टीचिंग वर्कशॉप या विषयावर चार दिवस कृती आधारित प्रशिक्षण देण्यात आले व त्याचा लाभ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना होणार आहे.
अनेक शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन अगस्त्या फाउंडेशनची स्थापना आंध्रप्रदेश येथील डोंगराळ भागात केली. 172 एकरमध्ये निसर्गाचे रक्षण करून सुंदर निसर्गमय वातावरणात वेगवेगळे जिवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित आणि कला यांचे प्रयोगशाळा तयार करण्यात आल्या आहेत. ज्या डोंगराळ भागात एकही पाण्याचा थेंब नव्हता, तेथे सध्या दहा पाणवटे, वॉटर हार्वेस्टिंगमुळे शक्य झाले आहे. तसेच येथे सर्व प्रकारचे प्राणी जसे मोर, हरीण, साप आढळून येतात.
विद्यार्थ्यांनी ५ ई मॉडेलद्वारे शिक्षण घ्यावे असे या ट्रेनिंग मध्ये सांगण्यात आले. दरवर्षी महाराष्ट्रातून नाही तर संपूर्ण भारतातून 2000 इतके शिक्षक येथे प्रशिक्षण घेतात. सदर प्रशिक्षणात मंजुनाथ यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये संपूर्ण नियोजन जानकी बाई यांनी केले.
सहभागी प्रशिक्षणार्थी मध्ये नागपूर जिल्हातील शाळांमधील शिक्षक सुनील वेळेकर, वसुंधरा धोटे, अभिषेक देशमुख, वर्षा राऊत, सायली शेंडे, गौतम गणवीर, सुधीर खंडाईत, अरविंद भिवगडे, मकरंद नागपुरे, उपस्थित होते. सर्व प्रशिक्षणार्थीना जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जयेश वाकुडकर तथा गट शिक्षणअधिकारी विजय भाकरे यांनी संधी उपलब्ध करून दिल्या. या प्रशिक्षणामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा गणित व विज्ञान विषयांमध्ये दर्जा वाढ होण्यास मदत होईल.

0 Comments