Spread the love

रामटेक तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उमरी चिचदा येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा करण्यात आले. भव्य दिव्य अशा कार्यक्रमात विविध कलागुणांना वाव देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बिरसा मुंडा यांच्यावर आधारित तसेच देशभक्तीपर गीते नृत्य ,नाट्य व नकला असे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पारंपारिक आदिवासी नृत्य, छत्तीसगढी दक्षिणात्य नृत्य व देशभक्तीपर गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद कुभरे होते. प्रमुख अतिथी म्हणून सरपंच रवींद्र कुंभरे ,माजी पंचायत समिती सभापती कैलास राऊत, उपसरपंच रवींद्र धुर्वे, संगीता चिंचोळकर, आशा खंडाते, शुभम राठोड एम पी डब्ल्यू. व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य गण यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश राठोड व प्रीती हटवार यांनी संयुक्तपणे केले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका सुलोचना धुर्वे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संतोष राठोड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोहर सोनटक्के, संगीता चाके. जयंत निंबाळकर, जितेंद्र धुर्वे व राम मडावी यांनी विशेष परिश्रम घेतले. स्नेहसंमेलनाने विद्यार्थ्याच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून दिल्यामुळे उपस्थित ग्रामस्थ आणि पालकांनी भरभरून कौतुक केले. विद्यार्थी व पालकांना स्वरूची भोज देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Categories: BlogNews

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *