विविध राज्याच्या संस्कृतीने वेधले सर्वांचे लक्ष
नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील देवलापार येथील स्वामी विवेकानंद सेवा शिक्षण समिती द्वारा संचालित स्वामी विवेकानंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मध्ये अतुलनीय भारत की सांस्कृतिक धरोहर या उपक्रमा अंतर्गत आनंद मेळाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले. आपला भारत देश विविध भाषा संप्रदाय प्रांत आणि भौगोलिक परिस्थितीने जसा वेगळा आहे तसाच पोशाख खाद्यपदार्थ याही दृष्टीने तो वेगळा आहे. संपूर्ण भारत देशाच्या संस्कृतीचे एकाच ठिकाणी दर्शन व्हावे या प्राचार्य जयंत देशपांडे यांच्या संकलपनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देवलापार क्षेत्र हे आदिवासी बहुल आहे.

आदिवासींनी आपली संस्कृती सभ्यता टिकून ठेवलेली आहे. या आदिवासी संस्कृतीचा नागरी समाजाला परिचय व्हावा यासाठी आदिवासी संस्कृती व त्यांच्या जीवनशैलीचे दर्शन घडवण्यासाठी एक दालन उघडण्यात आले होते. महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, राजस्थान, दक्षिण भारत, मध्य प्रदेश येथील भाषा, खाद्यपदार्थ यांचे सादरीकरण वेगवेगळ्या वर्गाने केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष जयंतराव मुलमुले हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध उद्योगपती सतीशजी गोयल, जिल्हा परिषद सदस्या शांताताई कुमरे, संस्थेचे कार्यवाह प्राचार्य डॉक्टर अरविंद जोशी, आजूबाजूच्या गावातील सरपंच, देवलापार येथील प्रतिष्ठित नागरिक व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments