Spread the love

नवोपक्रम क्रमांक 1

घर तिथे शाळा गाव तिथे शिक्षण

अत्यंत प्रतिष्ठित शरद पवार इन्स्पायर इन एज्युकेशन फेलोशिपसाठी निवड झालेला उपक्रम

आदिवासी भागात शिक्षणाविषयी अनास्था असल्याने  विद्यार्थी अभ्यासाकडे तसेच वाचनाकडे दुर्लक्ष करतात. पालकांची निरक्षरता, गरिबी, बेरोजगारी इत्यादी कारणांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणात अडचण निर्माण होते. या कारणांमुळे शाळेत विद्यार्थ्यांची अनुपस्थिती तसेच गळतीची समस्या निर्माण होते. घरात शिक्षणाचे वातावरण नसल्याने विद्यार्थ्यांच्या मनात अभ्यासाविषयी अनास्था निर्माण होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना गावात व घरात वावरतांना चालत फिरत शिक्षण मिळावे यासाठी या उपक्रमाची निवड केली आहे.

घर तिथे शाळा गाव तिथे शिक्षण या उपक्रमाद्वारे शाळा परिसरातील गावांमध्ये व गावातील घरांमध्ये शैक्षणिक वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे. घरातील भिंती शैक्षणिक माहितींनी व पाठ्यपुस्तकातील पाठांनी रंगविण्यात येणार असल्याने चालत फिरत पुस्तकातील अनेक संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.

घर तिथे शाळा गाव तिथे शिक्षण हा उपक्रम नवी असून शासकीय योजनांना पूरक आहे. गावोगावी अनेक ठिकाणी भिंतीवर जाहिरात, शासकीय माहिती यांचे चार्ट व बॅनर लावले जातात. त्यालाच समांतर शैक्षणिक साहित्याचे चार्ट अथवा भिंती रंगविल्यास गावात जागोजागी शिक्षण मिळेल. भिंतीवर मराठी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे यांची माहिती दर्शविली जाईल सदर उपक्रम राबविण्यासाठी शाळेतील चित्रकला विषयात पारंगत असलेले विद्यार्थी व गावातील पेंटर यांची मदत घेणार आहे. तसेच मी या कामात पारंगत आहे. त्यामुळे उपक्रमासाठी रंग साहित्य, ब्रश, चार्ट्स इत्यादींची गरज पडणार आहे.

नाविन्यपूर्ण उपक्रमांची यादी

१) आदर्श परीपाठ

२) दिनांकानुसार पाढा

३)चित्रकला स्पर्धा

४)वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन

५)सांस्कृतिक कार्यक्रम

६)गीतगायन स्पर्धा

७)भाषण स्पर्धा

८)क्रीडा स्पर्धा

९)वाढदिवस साजरे करणे।   

१०)भित्तिपत्रक तयार करणे

११)निसर्गसहल

१२) स्वच्छता सप्ताह            

१३)विद्यार्थी दत्तक घेणे

१४) जयंत्या व पुण्यतिथी

१५)बचत बँक

१६)हस्ताक्षर सुधार

१७)हजेरी घेताना इंग्रजी शब्द

१८)वाचन कट्टा

१९)बाजार

२०)परसबाग

२१)उपस्थिती ध्वज

२२)इंग्रजी संभाषण

२३)शब्द बँक

२४)स्वच्छ मुलगा-मुलगी

२५)दत्तक कुंडी प्रकल्प

२६)तंबाखू मुक्त शाळा

२७)दत्तक मित्र

२८)वर्तमानपत्र वाचन

२९)विविध क्रीडा स्पर्धा

३०)चित्रकला स्पर्धा,

३१)निबंध लेखन

३२)वक्तृत्व स्पर्धा आयोजन

३३)नवरत्न स्पर्धा

३४)दप्तराविना शाळा

३५)झुलती बाग

३६)हस्ताक्षर सुधार प्रकल्प

३७)करू या आम्ही संचालने

३८)प्रश्न आमचे ,उत्तर आमचे

३९)वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन

४०) विद्यार्थ्यांचे सत्कार

४१)कला, कार्यानुभव कोपरे

४२)बाल आनंद मेळावे

४३) तज्ञांचे मार्गदर्शन

४४)प्रवेशोत्सव

४५)100% पटनोंदणी

४६)लघु उद्योगाला भेटी

४७)हरित शाळा

४८)पक्ष्यांना खाऊ

४९)ज्ञानरचनावादी साहित्य

५०)डिजीटल शाळा

५१)टॅबलेट स्कूल

शाळेतील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे उपक्रम.

१) रोज नवीन अक्षराचे शब्दचक्रवाचन घेणे.

२)शब्दभेंड्या खेळ घेणे.

३)वाचनपट(शब्दडोंगर)बनवणे.

लेखनाचे उपक्रम

१)धुळपाटीवर लेखन

२)हवेत अक्षर गिरविणे.

३)समान अक्षर जोड्या लावणे.

४)अक्षर आगगाडी बनवणे.

५)पाहुणा अक्षर ओळखणे.zs

६)चित्रशब्द वाक्यवाचन करणे.

७)बाराखडीवाचन करणे.

८)बाराखडीतक्तेवाचन करणे.

९)स्वरचिन्हयुक्त शब्दांचे बाॅक्समधील ५०० शब्द वाचणे.

१०)थिमनुसार शब्दचक्र बनवणे.

११)कथालेखन करणे.

१२)कवितालेखन करणे.

१३)चिठठीलेखन करणे.

१४)संवादलेखन करणे.

१५)मराठी शब्दकोशात शब्द शोधणे.

१६) आवडीचा शब्द घेवुनवाक्ये बनविणे.

गणित विषयातील उपक्रम

१)खडे मोजुन घेणे,एकमेकांचे मोजणे

२)वर्गातील वस्तु मोजणे

३)अवयव मोजणे

४)कार्डसंख्या पाहुन वस्तु मांडणे

५)कार्ड घेवुन गोलात फिरणे नाव घेणाराने आत जाणे.

६)आगगाडी तयार करणे

७)दोघींनी मिळुन संख्या बोटावर दाखवणे.

८)माळेवर मणी मोजुन संख्या दाखवणे.

९)अंकाची गोष्ट सांगणे.

१०)बेरीज व्यवहार मांडणी शाब्दीक व अंकी करणे.

११)बेरीज उभी आडवी मांडणी करणे

१२)चौकटीची जागा बदलुन उदाहरण सोडवणे.

१३)बेरीजगाडी तयार करणे.

१४)अंकांपुढे वस्तु मांडणे

१५)गठ्ठे सुट्टे सांगणे

१६)मणीमाळेवर १ ते १०० संख्यावाचन रोज ४ वेळा घेणे.